1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अक्षरश: आभाळ फाटल्याचा अनुभव घेतला औरंगाबादकारांनी

weatherforecast
Spread the love

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला शनिवारी पहाटे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस अन् वीजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. शुक्रवारीदेखील शहर तसेच परिसरातील काही भागात पावसानं चांगलंच झोडपून काढलं होतं. पुढील चार दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज, हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी पहाटे म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी पहाटेच शहरावर वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. कडाडणाऱ्या वीजांच्या आवाजाने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची मात्र झोप उडाली. भल्या पहाटे औरंगाबादकरांनी आभाळ फाटल्याचा अनुभव घेतला.

कारण मागील काही दिवसांपासून होणाऱ्या पावसाने शहरातील अनेक वसत्यांमध्ये पाणी शिरत आहे. औरंगाबाद परिसरातील ग्रामीण भागालाही या पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे आधीच ओला दुष्काळाचा सामना करणाऱ्या पिकांचं आणखी नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासूनच वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पंचवीस मिनिटं अखंड वीजांचा वर्षाव

02 ऑक्टोबर रोजी पहाटे 03.25 वाजता शहरात हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर 03.38 दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आभाळात एका-मागून एक वीजा कडाडल्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे निसर्गाचं आणखी किती भयाण रौद्ररुप पहायला मिळणार, या धास्तीने औरंगाबादकरांची झोप उडाली. पहाटे 03.38 ला सुरु झालेला पाऊस 04.03 वाजेपर्यंत अखंड बरसत होता. या पंचवीस मिनिटात सरासरी 118 मिली प्रति तास या वेगाने पावसाच्या सरी कोसळतच होत्या.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महिलांना नौकरी करण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही; स...

    July 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपुणे: राज्यातील कुठल्याही महिलेला नोकरी करण्यापासून कोणतीही न्यायालय बंदी घालू शकत नाही. तसेच, मुल किंवा कर...

    चिपी विमानतळ उड्डाणास सज्ज; ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज झाले असून येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्ध...

    परमबीर सिंग यांच्या विरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात...

    March 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअडचणीत होणार आणखी वाढ माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग एकदा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सां...