1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भुजबळांच्या नावे धमकीचे फोन, ‘कलेक्टर’च्या नावाचाही वापर

chagan bhujbal
Spread the love

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या नावे पुन्हा एकदा धमकीचे फोन आल्याचा प्रकार घडला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बहुचर्चित भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेप्रकरणी अटकेत असलेले सुनील झंवर यांचा मुलगा सूरज झवंर यांना हे फोन आले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात अनेकदा भुजबळांच्या बंगल्यावरून बोलत असल्याच्या धमकीचे फोन करण्याचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी निफाडच्या महेंद्र पाटीलला पूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. आता असाच एक फोन सूरज झंवर यांना आल्याचे समजते. झवंर यांचे वडील सुनील झंवर हे भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेप्रकरणी अटकेत आहेत. याचप्रकरणी सूरज यांचीही चौकशी सुरू आहे. त्यांना 9423421111 या क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने पंकज भुजबळ बोलत असल्याचे सांगितले. सोबतच 8 सप्टेंबर रोजी भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले.

त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून एक फोन आला. त्यावरून भुजबळांचा पीए बोलत असल्याचे सांगितले. सोबतच तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात का आला नाहीत, अशी विचारणा केली. त्यानंतर जळगाव येथून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नावे एक फोन आला. त्या व्यक्तीने सूरज यांना तुमचे कोणते काम करायचे आहे, अशी विचारणा केली.
फोन करणाऱ्या व्यक्तीने पालकमंत्री छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या नावाचाही वापर केला. सूरज यांनी मित्राच्या घरून संबंधितांना फोन केला. तेव्हा समोरून छगन भुजबळ बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही आमचे काम करा. तुम्हाला समीर व पंकज मदत करतील. तुमचेही एक मोठे काम करून देण्यात येईल, असा निरोप दिला. भुजबळांच्या नावे धमकीचे फोन करून पूर्वीप्रमाणेच खोडसाळपणा सुरू असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    माझ्याही कानावरं आलंय, संजय राऊतांना अमेरिकेत राष्ट्...

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची मालिका अद्या...

    ‘शिक्षक गौरव’ पुरस्काराने निलीमा राऊत सन...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: जिल्हा परिषद नागपूर तर्फे जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त ‘जिल्हा शिक्षक गौर...

    नवाब मलिक यांनीच दंगल घडवून आणली; भाजप नेत्याचा आरोप

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveत्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहे...