1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारतीय हवाई दलाचा आज 89 वा स्थापना दिवस

IAF Day
Spread the love
यामागचा इतिहास जाणून घेऊ या

भारतीय नागरिकांसाठी आठ ऑक्टोबर हा दिवस खूप महत्वाचा आहे. या दिवशी भारतीय हवाई दल दिवस साजरा केला जातो. यावर्षी भारतीय हवाई दलाचा ८९ वा स्थापना दिवस साजरा केला जाईल. भारतीय हवाई दल जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक आहे. हवाई दलाने आपल्या शौर्याने भारताला अनेक वेळा अभिमान वाटावा असे क्षण भारताला दिले आहेत.

काय आहे दिवसाचा इतिहास?

हवाई दलाची स्थापना आठ ऑक्टोबर १९३२ रोजी झाली, म्हणून दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी हवाई दल दिवस साजरा केला जातो. देश स्वतंत्र होण्यापूर्वी हवाई दलाला रॉयल इंडियन एअर फोर्स (आरआयएएफ) म्हटले जात असे. स्वातंत्र्यानंतर, “रॉयल” हा शब्द काढून “भारतीय हवाई दल” वर करण्यात आला.

पहिली तुकडी कधी तयार झाली?

१ एप्रिल १९३३ रोजी हवाई दलाची पहिली तुकडी तयार करण्यात आली, ज्यात ६ आएएफ- प्रशिक्षित अधिकारी आणि १९ हवाई कर्मचारी होते.

कोण होते हवाई दलाचे पहिले प्रमुख?

स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी हवाई दल केवळ लष्कराखाली काम करायचे. लष्करातून हवाई दलाला ‘मुक्त’ करण्याचे श्रेय भारतीय हवाई दलाचे पहिले कमांडर-इन-चीफ, एअर मार्शल सर थॉमस डब्ल्यू. एल्महर्स्ट यांना जाते. स्वातंत्र्यानंतर, सर थॉमस डब्ल्यू. एल्महर्स्ट यांना भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख, एअर मार्शल बनवण्यात आले. १५ ऑगस्ट १९४७ ते २२ फेब्रुवारी १९५० पर्यंत ते या पदावर राहिले.

भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य

भारतीय वायुसेनेचे बोधवाक्य ‘नभ: स्पृशं दीप्तम’ असं आहे. हे गीतेच्या अकराव्या अध्यायातून घेतले गेले आहे. महाभारत युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रात भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेल्या प्रवचनाचा एक उतारा आहे.

Claim Free Bets

हवाई दलाचा ध्वज

हवाई दलाचा ध्वज, हा हवाई दलाच्या चिन्हापेक्षा वेगळा आहे. ज्यामध्ये सुरुवातीच्या एक चतुर्थांशमध्ये राष्ट्रध्वजासह निळा रंग आहे आणि राष्ट्रध्वजाच्या तिन्ही रंगांपासून बनविलेले एक वर्तुळ (वर्तुळाकार आकार) म्हणजे भगवा, पांढरा आणि हिरवा मध्य असा आहे. हा ध्वज १९५१ मध्ये स्वीकारण्यात आला.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आयआरसीटीसी करणार भारतामधील पहिली इंडिजिनिअस क्रूज ला...

    September 18th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveआयआरसीटीसी (IRCTC) कडून १८ सप्टेंबर रोजी भारतामधील पहिली इंडिजिनिअस क्रूज लायनर (Indigenous Cruise Liner) ल...

    देशात आज कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पूर्ण हो...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोना विरोधातील लढाईचा देशासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्...

    5 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील सर्व संरक्षित स्मारकां...

    August 4th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने बुधवारी घोषणा केली कि, देशात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआई) कडून...