1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

परिवहन मंत्री अनिल परब गोत्यात; अडचणीत वाढ

anil parab
Spread the love

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलिसांना केलेल्या फोनचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकारानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट बेकायदा ठरल्यानंतर आता वांद्रे पूर्वेकडील कार्यालयावर कारवाईचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील परब यांच्यासहित किमान 11 मंत्र्यांवर गंभीर आरोप सोमय्या यांनी करत महाविकास आघाडी सरकारचा डेरा डळमळीत करण्याचे काम केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील नेते रडारवर

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपने सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरकारमधील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करत विविध प्रकरण चव्हाट्यावर आणली आहेत. आता सोशल मिडियाच्या माध्यमातून 11 नेत्यांची नावे किरीट सोमय्या यांनी जाहीर केली. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लवकरच ईडी ( सक्तवसुली संचालनालय) किंवा सीबीआय कारवाई करुन अटक करणार असल्याची भाकित सोमय्या यांनी वर्तवले आहे. येत्या काळात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या चौकशीचा सिलसिला पहायला मिळणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले होते.

परबांच्या अडचणी वाढणार

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी वांद्रे पुर्वेकडील गांधी नगरमधील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळी जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी लोकायुक्तांकडे दाद मागितली होती. लोकायुक्तांनी याबाबत झालेल्या सुनावणीवेळी गृहनिर्माण विभागाला एका महिन्याच्या आत कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती सोमय्या यांनी प्रसार माध्यमांना दिली. म्हाडाने यासंदर्भात यापूर्वी नोटीस बजावल्या होत्या. त्यावेळी संबंधित अनधिकृत बांधकामाशी माझा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर म्हाडाने त्या मागे घेतल्या. आताही म्हाडाकडून योग्य कारवाई होईल, असे सांगत परिवहन मंत्री परब यांनी हात झटकले आहेत

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    वीज कंपन्यांतील नियमित व सहायक कर्मचाऱ्यांना सानुग्र...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय ऊर्जा...

    मोदी कर्मचां-यावर लवकरच प्रसन्न होणार

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रसन्न होणार असून, लवकरच एक गुड न्यूज घेऊन येण्या...

    राष्ट्रवादीने माजी गृहमंत्र्याबाबत भूमिका स्पष्ट करा...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून भूमिगत आहे. महाराष्ट्राला ही...