1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणी उठले विविध प्रश्न

mahant-of-aakhada-parishad
Spread the love

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या सर्व परिस्थितीला पाहता, या प्रकरणात नवीन आरोपी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी याना एका व्हिडिओ वरून ब्लॅकमेल केल्या जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल करण्यासाठी एका सीडीचा वापर केला जात होता.

पोलिसांचे म्हणणे आहे की, मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांनी असेही सांगितले की महंत नरेंद्र गिरी आपल्या एका शिष्यावर नाराज होते. या प्रकरणी त्याचा एक शिष्य आनंद गिरी याला पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून ताब्यात घेतले आहे.

मात्र, नरेंद्र गिरी यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा संशय प्रथम व्यक्त केला होता. परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की महंत नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी यांचे नाव लिहिले होते, त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी शोक व्यक्त केला आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषद ही भारतातील 13 आखाड्यांची संतांची संघटना आहे. ज्यामध्ये निर्मोही आखाडा देखील समाविष्ट आहे, ज्याने राम मंदिराच्या बांधकामात महत्वाची भूमिका बजावली आहे. नरेंद्र गिरी हे आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घ्यायचे आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    संविधानामुळे समतेचे राज्य आले; फडणवीस

    December 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे देशात समतेचे राज्य आले. व्यक्ती हा जन्माने नव्हे, तर कर्...

    सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे आदेश

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसरकारच्या सर्व याचिका जानेवारीपासून ‘ई-फायलिंग’द्वारेच उच्च न्यायालयात सरकारच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्य...

    काश्मीर खोऱ्यात सैन्यदलाची दहशतवाद्यांसोबत चकमक

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love2 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान. सर्च ऑपरेशन जम्मू-काश्मीरच्या शोपिया भागात दहशतवाद्यांशी, भारतीय सैन्यदलाच्...