1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली, अंध भक्तांनी आता काय करावे?

PM-modi
Spread the love

शिवसेनेचा सामन्यातून टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. मोदींनी पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. त्यावरुन आता सामनातून मोदी आणि मोदी भक्तांवर टीका करण्यात आली आहे. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल असे शिवसेनेने म्हंटल.

पंतप्रधान मोदी पोप यांना नुसतेच भेटले नाहीत तर पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता व शुद्धीकरण मोहिमा सुरू झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल,” असा उपहासात्मक टोला लेखातून लगावण्यात आलाय.

मोदी आणि पोप यांच्यात गरिबी निर्मूलनावर चर्चा झालीच असेल तर आपल्या देशातील गरिबी निर्मूलनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी पोपसाहेबांना नक्की कोणती माहिती दिली? मोदी आणि पोप यांच्यात चर्चा सुरु असतानाच इकडे ‘मनरेगा’ म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आर्थिक खडखडाट झाल्याचे वृत्त समोर आले. योजनेसाठी असलेला पैसा संपला असून या योजनेवर काम करणाऱया मजुरांची दिवाळी अंधारातच जाणार, असे चित्र निर्माण झाले आहे. देशातील 21 राज्यांत ‘मनरेगा’चे काम चालत असते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    UPSCI यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर,महाराष्ट्रातून प्...

    May 30th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: यूपीएससी (UPSC) अंतिम निकालाची घोषणा झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ते स्वतःचा नि...

    Punjab Elections 2022I आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवं...

    January 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: विधानसभा निवडणूकीत (assembly elections) कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी निवडणूक आयोगाने रैली आणि ज...

    एकनाथ, बंडाचा गाशा गुंडाळणार; बंडखोराचा संयम तुटला

    June 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveबंडखोर आमदारांमध्ये गुवाहाटी येथे जोरदार अंतर्गत वादावादी नागपूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर असू...