1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अब्दुल सत्तार यांना आम्ही आयुष्यभर टोप्या पुरवू- गिरीश महाजन

Abdul Sattar
Spread the love

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्याचा भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आयुष्यभर अब्दुल सत्तार यांनी टोपी लावूनच ठेवावी, त्यांना आम्ही टोप्या पुरवू, असा टोला गिरीश महाजन यांनी सत्तार यांना लगावला आहे.

गिरीश महाजन एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, युतीतून अब्दुल सत्तार निवडून आले आहेत, याचे त्यांनी भान ठेवावे. रावसाहेब दानवे यांची कामे मोठी आहे. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात मोठी कामे केली आहे. त्यांना पराभूत करणे तेवढे सोप नसल्यामुळे सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवे तर त्यांना आम्ही टोप्या पुरवू, असा टोला महाजनांनी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपचे नेते खासगीत कौतुक करतात, या सत्तार यांच्या वक्तव्याचाही महाजन यांनी समाचार घेतला. असे काहीही भाजपचे लोक म्हणत नाहीत. कोणत्याही भाजप नेत्याने असे कधीच म्हटले नाही. सत्तारांची बोलाची कढी आणि बोलाचाच भात असल्याचे महाजन म्हणाले. तसेच, भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम बगल में छुरी, या सत्तारांच्या वक्तव्यावर महाजन म्हणाले की, राम मंदिराचा विषय आता जुना झाला आहे. आता तर निवडणुकाही नसल्यामुळे राम मंदिरावर बोलण्यापेक्षा आता तुम्ही तुमच्याविषयी बोला, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी केली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    काँग्रेसने फूट पाडण्यासाठी ओबीसी आरक्षण दिले नाही : ...

    September 15th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. ओब...

    २२ वर्ष एकहाती सत्ता राखलेली नगरपालिका घेतली ताब्यात

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादीचा काँग्रेसला अजून एक धक्का राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलेल्या राष...

    समुद्रपूर येथे मतदान अधिका-यांचे प्रशिक्षण संपन्न

    January 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवर्धा: समुद्रपूर तालुक्यातील नगर पंचायतीच्या उर्वरीत दोन प्रभागातील निवडणूक दि. १८ जानेवारी रोजी घेण्यात ये...