1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

हिवाळी अधिवेशनात मोठ्या नेत्यांची नावं जाहीर करणार; नवाब मलिकांच्या माहितीने खळबळ

nawab malik
Spread the love

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करतानाच काही नेत्यांचे ड्रग्ज प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. त्या नेत्यांची नाव जाहीर करणार असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले, ‘महिनभरात जी परिस्थिती होती. तशी आता राहिली नाही. परिस्थिती बदलल्यानंतर कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हॅण्ड समीर वानखेडेंना एनसीबी कार्यालयात भेटत आहेत. कासिफ खानला अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होईल आणि त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहे, हे उघड होईल’, अशी माहिती मलिकांनी दिली.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक.
हे षडयंत्र… योगी आदित्यनाथांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
यामागे भाजप आहे का असा प्रश्न मलिकांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मलिक म्हणाले, ‘माझ्याकडे काही हत्यारं राहुद्या. विधानसभा वादळी ठरणार आहे. आता बोलल्यानंतर काही लोक न्यायालयात जातील. विधानसभेत माझ्यावर जे काही आरोप होणार आहेत. त्याचं उत्तर देताना मी जे काही समोर आणेल, त्यानंतर राज्यातील काही नेत्यांना तोंड दाखवणं कठीण होऊन जाईल’, असा इशारा मलिकांनी दिला.

‘या ड्रग्ज प्रकरणात बऱ्याच लोकांचं कनेक्शन आहे. ते पुरावे मी गोळा करतोय. नेत्यांच्या बाबतीत आज मी नाव घेत नाही. ७ डिसेंबपासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. त्यात भाजपच्या वतीने माझ्यावर हल्ले होणार आहेत. पण मी कोणत्याही नेत्याचं नाव घेऊन विषय डायव्हर्ट करणार नाही. हिवाळी अधिवेशनात मी मोठमोठे नावे जाहीर करणार आहे’, असा दावा मलिकांनी केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    वीज कंपन्यांतील नियमित व सहायक कर्मचाऱ्यांना सानुग्र...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय ऊर्जा...

    अरबी समुद्राला सिंधुसागर हेच नाव सार्थ; राज्यपाल कोश...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसिंधु नदी हा केवळ भौगोलिक प्रश्न नसून भारताच्या दृष्टीने त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक व अध्यात्मिक परिमाण आह...

    संजय राऊतांचा फडणवीसांना फुकटा सल्ला,” तुम्ही ...

    June 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यातील वृत्तवाहिनीची पहाट खासदार संजय राऊत यांच्या विधानाने सुरू होत असते असे अनेकांचे म्हणणे असल...