1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कृष्णा नदीवरील 135 वर्ष जुना ब्रिटीशकालीन पूल जमीनदोस्त

Spread the love

सातारा जिल्ह्यातील वाई शहरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीवरील जुना ब्रिटिश कालीन पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. या कृष्णा नदीवर सात घाट आणि शेकडो पौराणिक मंदिरे असल्यामुळे वाई शहरास दक्षिण काशी संबोधले जाते. याच वाई शहराच्या उत्तर- दक्षिण भागास जोडणारा मुख्य ब्रिटीश कालीन कृष्णा पूल आहे.

या पुलाला 135 वर्षे पूर्ण झाली असून तो पाडण्यात येत असल्याने वाईकरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. 1884 साली ब्रिटीशांच्या राजवटीत हा पूल बांधण्यात आला होता. पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1984 साली ब्रिटीश शासनाने महाराष्ट्र शासन आणि वाई नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्या बाबतीत पत्र पाठवले होते.

या पुलावर मोठया प्रमाणावर झाडे-झुडपे उगवली होती. गेली अनेक वर्षे एक नवीन सक्षम पूल उभारण्याची मागणी केली जात होती. तसेच नागरिकांच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नवीन पुलाचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता. पुलाचे शहराच्या दृष्टीने महत्व ओळखून शासनाने पुलाला मंजुरी दिली.

Claim Free Bets

नवीन तंत्रज्ञानाने युक्त पंधरा कोटींचा आराखडा असणारा नवीन पूल मंजूर करण्यात आल्या नंतर अनेक वर्ष वाईकरांना खंबीर साथ दिलेला ब्रिटिश कालीन पुल आता पाडण्यात येत आहे. पाडण्यात येणाऱ्या या पुलाविषयी वाईकरांच्या भावना अतिशय हळव्या आहेत.

    THE FREE MEDIA

    THE FREE MEDIA

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी केला जमावावर गोळीबार, 5 ठार

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमणिपूरातील बी गमनोम परिसरात कांगपोकपी जिल्ह्यात तणाव पसरला जेव्हा अतिरेक्यांनी जमाव गोळा करण्याच्या ठिकाणी ...

    क्रूज ड्रग्ज प्रकरणी अनन्या पांडेचा कबुलीनामा; आर्यन...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नंतर आता चंकी पांडेची लेक अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव वॉट्सअप चॅटमुळे समोर आल...

    गृहमंत्री अमित शहा,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ श...

    July 18th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी आज १८ जुलै रोजी मतदान होत आहे. २१ जूनला देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आह...