1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये सह्याद्रीवर चर्चा; भेटीत दडलंय गुपीत

cm&pawar
PC: ANI
Spread the love

राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवारांची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता सह्याद्रीवर राज्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देण्यासंदर्भात सादरीकरण होत आहे. यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) चे सादरीकरण सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत.

राज्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देण्यासंदर्भात सादरीकरण झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात एक बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी मुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात होत असलेल्या बैठकीला फार महत्व प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच इतरही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्तित राहणार आहेत.

राजकीय बैठक होणार?

या बैठकीच्या संदर्भात संजय राऊत यांनी म्हटलं, बैठकीत इतरही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या मुख्यमत्र्यांची बैठक गृहमंत्र्यांनी बोलावली आहे. ज्या राज्यांत नक्षलवाद्यांचा त्रास आहे अशा राज्यांच्या मुख्यमत्र्यांसोबत बैठक आहे. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय बैठक होणार आहे का?

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमक...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. श...

    ‘मस्तं चालंलय आमचं’; म्हणत अजित पवारांनी...

    June 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपुणे: नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भा...

    नागपूरच्या रस्त्यामध्ये झोल झोल ….. नागपूचे रस...

    September 6th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सिटिझन्स फोरमने (सामाजिक संस्था) ५ सप्टेंबर...