1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘साखर साखर करत राहिलात तर, ‘गडकरीचे मोठे वक्तव्य’

nitingadkari-thefreemedia
Spread the love

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज सातारा जिल्ह्यातील कराडमधील कृष्ण दैद्यकीय महाविद्यालयातील कोविड योद्ध्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की,’आरोग्य किंवा शिक्षण क्षेत्राबाबत केवळ सरकारवर भर न टाकता, समाजातील अन्य घटकांनी समाजासाठी एकत्र आले पाहिजे. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्राचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी सरकारशिवाय, सामाजिक संस्था, खासगी कंपन्या, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा’ असे गडकरी म्हणाले.

कोरोना काळातील आठवण सांगत गडकरी म्हणाले की,’कोव्हिडं काळाची आठवण काढली तरी डोळ्यात पाणी येतं. शिक्षण आणि आरोग्य आरोग्य क्षेत्रांती सरकारसंह समाजातील घटकांचं योगदान आवश्यक आहे. देशात आता तातडीने ६०० मेडिकल कॉलेज आणि अन्य सुविधा गरजेच्या आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या खाजगी संस्थांना मदत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न’ असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे साखर कारखान्यांसंदर्भात भाष्य करत ते म्हणाले की,’विदर्भात मी एकटाच तीन साखर कारखाने चालवतो. कारखाना चालवून आता मी थकलो. महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना विनंती आहे साखर उत्पादन कमी करा, इथेनॉल निर्मितीवर भर द्या. जे परावनगी मागतील त्यांना परवानग्या मी मिळवून देतो’. तसेच ‘सरकारला आउट ऑफ बॉक्स कल्पना सांगताना आणि अंमलात आणताना खूप त्रास होतो. सत्ताकारण हेच राजकारण हे मला पटत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल, मी इथेनॉल निर्मिती संकल्पना आणली नसती तर सगळे खड्यात गेले असते. येणाऱ्या काळात आत्मनिर्भर भारत आपल्याला बनवायचा आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आजूनही खूप कामाची गरज आहे’ असेही गडकरी म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जलआक्रोश मोर्चात देवेंद्र फडणवीसांचा आरोप

    June 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठवाड्यातील पाणीप्रश्नांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष जालना: राज्यात सर्वत्र पाणीप्रश्न पेटला असून ते सोडवण्...

    मला पार्टीचे निमंत्रण दिलं होतं… पण, मी पार्टीला गेल...

    November 8th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveक्रूझ ड्रग्ज प्रकरण दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील...

    ‘शिवसेनेला मोठा झटका’, ‘या’ ...

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आली आहे. सध्या महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. ...