1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शेतक-यांना मदत मिळावी म्हणून उद्या मनसेचे ‘धरणे’

mns
Spread the love

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हतबल बळीराजाला तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने मंगळवारी (दि.12) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे व सरचिटणीस संदीप नागरगोजे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

राज्य सरकारने पंचनाम्यांचा फार्स न करता तात्काळ हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करावी तसेच प्रत्येक गुरामागे देखील 50 हजरांची मदत जाहीर करावी. तसेच ज्या शेतकरी बांधवांचे घरे उध्वस्त झाली असतील त्यांना देखील आर्थिक मदत यावी या मागण्यांसाठी उद्या धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घरकोंबड्या व झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी ‘जागरण गोंधळ’ देखील करणार असल्याची माहिती धोत्रे यांनी दिली.

सरकारमधील नेते केवळ बांधांवर जाऊन हातात पीक घेऊन फोटोशेसन करत आहेत. नुकसान झाले हे जगजाहीर आहे, विविध माध्यमातून हे नुकसान डोळ्यांना दिसत आहे. आम्ही तिथे गेलो फोटो काढला आणि झाले ? मदतीचा काय ? असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मनसेकडून 10 हजारांची मदत

Claim Free Bets

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मनसेच्या वतीने फुल न फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे 10 हजारांची मदत देऊ केली असल्याचे देखील धोत्रे यांनी सांगितले. आम्ही शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन केले मात्र फोटोसेशन केले नाही.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    औरंगाबाद ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या वर्गाची घं...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात सर्वत्रच कोरोनामुळे मागील २ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. गावांमध्य...

    NCB च्या पथकाची मोठी कारवाई; नांदेड जिल्ह्यात तब्बल ...

    November 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई येथील एनसीबी च्या पथकाने मोजे मांजरम तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे पहाटे पाच च्या सुमारास सापळा रच...

    निर्वाण फाउंडेशन, नाशिकतर्फे “इंटरनॅशनल आयडॉल ...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनिर्वाण फाउंडेशन, नाशिकच्या वतीने देण्यात येणारा “इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड-2021” श्रीमती माधुरी प...