1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

Omicron व्हेरियंट जीवघेणा नाही, अमेरिकेच्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांचा दावा

Spread the love

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) हा निश्चितरित्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक नाही, असे अमेरिकेतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फॉउसी यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या के बी.1.1.1.529 व्हेरियंटमध्ये मोठ्या संख्येने म्युटेशन पहायला मिळत आहेत. तरीही हा व्हेरियंट जीवघेणा नाही. नव्या व्हेरियंटच्या अभ्यासातून हा कमी गंभीर स्वरुपाचा असू शकतो, असे संकेत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ओमायक्रॉन बाबत आपले मत व्यक्त केले आहे.

डॉ. फॉउसी यांनी यासाठी दक्षिण आफ्रिकेचे उदाहरण दिले आहे; जिथे ओमायक्रॉनचा पहिल्यांदा शिरकाव झाला होता. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन संक्रमणाची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत कमी आहे. एका विषाणू अधिक संसर्गजन्य आहे म्हणून त्यामुळे अति गंभीर आजारी अथवा मृत्यू होतील असे काही नाही, असे डॉ. फॉउसी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे सिंगापूर येथील तज्ज्ञांनीदेखील स्पष्ट केले आहे की ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरियंट पेक्षा अधिक धोकादायक नसल्याचे आढळून आले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    हाच तो, अफगाणिस्थानातून बाहेर पडणारा शेवटचा अमेरिकी ...

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतालिबानने अफगाणिस्थानचा कब्जा घेतल्यावर अमेरिकन सैनिकांनी दिलेल्या मुदतीच्या आधीच अफगाणिस्थान सोडला असून शे...

    राष्ट्रकुल स्पर्धा : भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण भरारी’

    August 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपहिल्यांदा भारताच्या खात्यात पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेच्या पदकाची कमाई नवी दिल्ली : यंदाच्या राष्ट्रकुल स्प...

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रु...

    July 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्याबरोबर चर्चा ...