1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आपले राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम आहे. मात्र विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्त्वाचा आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार जयंत आजगावकर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, संस्थेचे विजय वैद्य,प्रा.बी.आर.शर्मा हे उपस्थित होते.

यावेळी विज्ञान व उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सन २०२१ च्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांच्या हस्ते त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्हिडीओद्वारे आभारपर मनोगत व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ कोल्हापूर व तालसंदे आकुर्डी पुणेचे कुलगुरू डॉ.संजय पाटील, नवी दिल्ली एआयसीटीई या संस्थेचे सदस्य डॉ.देविप्रसाद शर्मा, कोलकाता येथील एनटीटीआर या संस्थेचे संचालक प्रा.राजीव कुमार, कानपूर येथील एचव्हीटीयू विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ.ओमकार सिंग, म्हैसूर येथील व्हीजेटीआर येथील शास्त्रज्ञ डॉ.फारूक काझी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी देशातील उत्कृष्ट कुलगरु तसेच इंजिनीयरींग महाविद्यालयांच्या प्राचार्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Claim Free Bets

मुख्यमंत्री म्हणाले, तंत्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे. आज तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी आपल्याला निसर्गातून अनेक गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. आपल्याकडे तंत्रज्ञानातील अनेक विद्वान लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या राज्याला नक्कीच पुढे नेवूया. राज्यात नव्याने होणारे कला विद्यापीठ ही काळाची गरज आहे. आगामी काळातील कला विद्यापीठ राज्याच्या विकासात नक्कीच भर घालणारे आहे, असे मतही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पुण्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील ५६ टक्के बालकांना प...

    January 31st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे कडक निर्बंध तसेच कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना ...

    देशाच्या विकासात सहकाराचा मोठा वाटा; अमित शहा

    September 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाच्या विकासामध्ये सहकार क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करुन विकासा...

    परमबीर सिंहांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया&...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईचे वादग्रस्त ठरलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे सिन्नरमध्ये अफाट ‘माया’ असून, त्यांनी ह...