1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

BCCI च्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली

Spread the love

यसीसीने घेतला महत्वाचा निर्णय, नऊ वर्षानंतर केला महत्वाचा बदल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरभ गांगुलची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (म्हणजेच आयसीसीच्या) क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालीय. आयसीसीच्या गव्हर्निंग बॉडीने बुधवारी म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२१ रोजी यासंदर्भातील माहिती दिली. गांगुलीने त्याचा माजी सहकारी अनिल कुंबळेची जागा घेतली. २०१२ पासून कुंबळे या पदावर कार्यरत होता. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी मला आयसीसीच्या पुरुष क्रिकेट समितीच्या अद्यक्षपदी सौरव गांगुलीचं स्वागत करताना फार आनंद होतोय, असं म्हटलंय.

आयसीसीच्या अध्यक्षांनी, “जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आणि नंतर एक प्रशासकीय जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती म्हणून सौरभ गांगुलीचा अनुभव आयसीसीला पुढे जाण्यासाठी आणि क्रिकेट संदर्भातील निर्णयांना योग्य दिशा देण्यासाठी महत्वाचा ठरेल. मागील ९ वर्षांपासून अनिल कुंबळेने या पदावर असताना केलेल्या कामासाठी मी त्याचे आभार मानतो. कुंबळेच्या कालावधीमध्ये डीआरएस अधिक नियमतपणे वापरण्यापासून त्यात वेळोवेळी सुधारणा करत गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये सुधारणा झालीय. तसेच गोलंदाजीच्या शैलीसंदर्भातही या काळात निर्णय घेण्यात आले,” असं बार्कले म्हणालेत.

आयसीसीची क्रिकेट समिती क्रिकेटच्या खेळामधील महत्वाचे बदल, नियम आणि क्रिकेटचा अधिक अधिक प्रसार करण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय़ घेण्याआधी /त्यासंदर्भात विचार विनिमय करणं आणि ते निर्णय अंमलात आणण्यासंदर्भातील काम करते.

आयसीसीने मंगळवारी अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील क्रिकेटच्या परिस्थितीचा समिक्षा करण्यासाठी एका कार्यकालीन गटाची स्थापना करण्यात आलीय. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर येथील क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. खास करुन महिला क्रिकेटवरील संकटाबद्दल जगभरातील क्रिकेट जाणकार चिंतेत आहेत. महिलांना क्रिकेट खेळू न देण्याच्या तालिबानच्या भूमिकेमुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान पुरुष संघासोबतचा एकमेव कसोटी सामना रद्द केलाय.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इंधन दरवाढ विरोधात कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन व निदर्शने

    April 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस ॲड. नंदाताई पराते यांच्या नेतृत्वात आज दि ३१ मार्च रो...

    कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा तोंड वर काढले…. !

    June 17th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशातील काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. कोरोना रुग्णांची वाढती सं...

    टीम इंडियामध्ये पाच पदांसाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveटीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह पाच पदांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. व...