1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेकरीता विद्यार्थ्याला मिळाले चक्क ‘चीन’ येथील केंद्र ; घोटाळ्यामुळे परीक्षार्थी त्रस्त

NEERexams
Spread the love

महाराष्ट्र शासनाकडून पदांच्या भरतीसाठी विविध परीक्षा घेतल्या जातात. त्याकरिता प्रवेशपत्र परीक्षार्थींना दिले जाते. त्यात परीक्षा देणाऱ्याचे नाव, परीक्षा केंद्र, परीक्षेचे वेळ, परीक्षा दिनांक, तसेच परीक्षे संबंधी इतर माहिती त्यात दिलेली असते. पण शनिवारी २५ सप्टेंबर आणि रविवार २६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत शासनाने चांगलाच घोटाळा करून ठेवला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा उमेदवारांना फक्त महाराष्ट्राबाहेरील केंद्र आले नसून चक्क देशाबाहेरील परीक्षेचे केंद्र मिळाले आहे. उमेदवारांना चीन देशातील परीक्षेसाठी केंद्र मिळाले आहे. कोणाला उत्तर प्रदेश नोएडा अशी ठिकाण मिळाली आहे, तर कोणाला अर्धाच परीक्षा केंद्राचा पत्ता आला आहे.

अनेकांच्या नावे चुकीची आहेत. परीक्षार्थींनच्या नावाच्या ठिकाणी वडिलांचे नाव किंवा आईचे नाव आले आहे. लिंग भरण्याच्या ठिकाणी मुलगा असल्यास महिला लिहून आले आहे आणि तसेच मुलगी उमेदवारांच्या ठिकाणी पुरुष लिहून आले आहे. आधारकार्ड हे ओळखपत्र पाहून विद्यार्थ्यांना शासन परीक्षा देण्याची परवानगी देणार तर मग विद्यार्थ्यांच्या नावाच्या घोटाळा कसा सोडवणार? हा मोठा प्रश्न आहे.

Claim Free Bets

तसेच काही विद्यार्थ्यांनी दोन वेगवेगळ्या पदासाठी असलेल्या परीक्षेसाठी भरले असल्यास दोन्ही परीक्षेची एकाच वेळ देण्यात आली आहे, आणि त्यातही दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये परीक्षार्थींना परीक्षेचे सेंटर देण्यात आले आहे. तसेच सेंटरचे नाव आले तर जिल्हा आला नाही, तालुका आला नाही मग विद्यार्थी सेंटर शॊधणार कस ?

आरोग्य विभागाच्या विविध पदाच्या परीक्षा आहे. जसे आरोग्य सेवक, क्लर्क, लॅबोरेटरी असिस्टंट अशा अनेक पदांच्या परीक्षा शनिवारी २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र्र शासनाकडून परीक्षेच्या अगदी दोन दिवस अगोदर प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना देण्यात आले. काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट किंवा प्रवेशपत्र डाउनलोड होण्यात देखील समस्या येत होत्या.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भवानीपूर पोटनिवडणूक रद्द होणार नाही: कोलकत्ता हायकोर्ट

    September 28th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोलकत्ता हायकोर्टाने मंगळवारी निर्णय सांगितला कि, भवानीपुर विधानसभा सीटवर होणाऱ्या पोटनिवडणूक, ज्यात पश्चिम...

    मला अर्थमंत्री होऊ द्या, 20 रुपयांनी पेट्रोलचे दर कम...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन केंद्र सरकार विरोधात टीकेची झोट उठवत होते. केंद्र सरकारकडून इंधन दरवाढीवर राज्याती...

    वाघ आहे मी, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरत नाही; चित्रा वाघ

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादीचे नेते महेबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यां...