1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘देशासाठी ओझं असलेले, अशिक्षित लोकं कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाही’; अमित शहांचे वादग्रस्त वक्तव्य

amit shah
Spread the love

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद टीव्हीतर्फे मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या आज पर्यंतच्या कारकिर्दीची भरभरून स्तुती केली आहे. पण त्यासोबत एक त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या मुलाखती दरम्यान, त्यांनी “अशिक्षित लोक हे देशावरचं ओझं आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

रविवारी झालेल्या या मुलाखतीत अमित शाह यांनी अशिक्षित लोकांना देशावरचं ओझं अस संबोधलं असून ते कधीच चांगले नागरिक होऊ शकत नाहीत, असं विधानही केलं आहे. या मुलाखतीत बोलताना शाह म्हणाले, एक अशिक्षित व्यक्ती देशावरचं मोठं ओझं असतं. कारण त्याला ना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती असते, ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची. त्यामुळे अशिक्षित व्यक्ती एक चांगली नागरिक कशी होईल?

ते पुढे बोलताना म्हणाले, जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा मुलं शाळेत न जाण्याचं प्रमाण जास्त होतं. मोदी यांनी एखाद्या उत्सवाप्रमाणे मुलांना शाळेत टाकण्याची मोहीम राबवली. त्यांनी पालकांची एक समिती तयार केली. शिक्षकांच्या जबाबदाऱ्या ठरवून दिल्या. याचा परिणाम असा झाला की, शाळेबाहेर असलेल्या मुलांचे प्रमाण ३७ टक्क्यांवरुन एक टक्क्याच्याही खाली आले. या मुलाखतीदरम्यान शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकशाहीवर विश्वास असणारा नेता असे संबोधले आहे. ते म्हणाले की, टीकाकारही ही गोष्ट मान्य करतील की केंद्रीय मंत्रिमंडळ कधीही अशा पद्धतीने लोकशाही मार्गाने कार्यरत नव्हतं, जसं हे मंत्रिमंडळ काम करत आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    डिसेंबरपर्यंत ५५ कोटी लसीचे डोस देण्याचे आश्वासन देण...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणून कोरोना लसीकरणाकडे पाहिले ज...

    सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी; कोरोनामुळे मृत्यू झालेल...

    October 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोनामुळे देशात मृत्यू झालेल्यांच्या नुकसान भरपाईबाबत सोमवारी अंतिम निर्णय देण्यात आला. केंद्र सरकारने सर्...

    नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे...